जागतिक चिमणी दिन

 

20 March World sparrow day



                 जरवर्षी जगभरात २० मार्च हा जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. घरगुती चिमण्या आणि इतर सामान्या पक्षी यांचे संवर्धन करण्याचा हा दिवस आहे. आपल्या आसपास असणारे पक्षी व त्यांना असणाऱ्या समस्या ह्या बद्दल जागृती करण्या साठी हा दिवस साजरा केला जातो.  

          भारता मध्ये नेचर फोरएव्हेर सोसायटी (NFS) ही संस्था चिमन्यांच्या संवर्धना मध्ये काम करत आहे. या संस्थेने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यास सुरवात भारता मध्ये २०१० साला पासून केली. नेचर फोरएव्हेर सोसायटीया संस्थे मार्फत या क्षेत्रात विशेष अस काम करणाऱ्या लोकाना “Sparrow Award” देऊन सन्मानित करण्यात येते.  

 चिमण्यांची संख्या का कमी होत आहे?

           चिमणी हा सगळ्याना आवडणार सुंदर पक्षी आहे. चिमणी हा माणसांच्या सहवासात राहणारा पक्षी आहे. चिमणी शहरी व ग्रामीण भागात आढळून येते. पर्यावरणा मध्ये चिमणी खूप महत्वाची आहे. आजकल होणारे प्रदूषण, आधुनिकीकरण, किटाकणाक्षकांचा वापर या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होताना दिसून येतो, वाढत चाललेले शहरीकरण आणि ह्या मुळे जंगलाचे कमी झालेले क्षेत्र ह्या गोष्टींचा चिमन्यांवर फरक पडत आहे. या सर्व गोष्टी मुळे त्यांना अन्न उपलब्ध कमी होत आहे त्या मुळे चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.

चिमण्यांच्या संवर्धना साठी आपण काय करू शकतो ?

१.     आपल्या घराच्या जवळ किंवा मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना खाण्यासाठी ठेऊ शक्यतो

२.     चिमण्यान एखाद्या भांड्यामध्ये पिण्यासाठी पानी ठेऊ शकतो.  

३.     अधिकची झाडे लाऊन जेणेकरून त्यांना निवारा होईल व आपल्याला ऑक्सिजन मिळेल.

४.     आपल्या शेतात कीटकनक्षकांचा वापर कमी करून

५.     प्रदूषण कमी करून

६.     इलेक्ट्रिक – म्यागनेटिक रेडियएशन नियंत्रित करून  

             जागतिक चिमणी दिवस हा सर्वांसाठी एक चांगल व्यासपीठ आहे. आपण सगळे एकत्र येऊन चिमन्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करू शकतो. चिमन्यांच्या संवर्धना साठी काय केले पाहिजे व की करू शकतो याचा विचार केला जाऊ शकतो. चिमन्यांच्या संवर्धन कार्या मध्ये भरपूर अश्या संस्था काम करतात. ह्या संस्थाच्या मदतीने आपण विविध उपक्रम राबवले जाऊ शकतात. चिमन्यांचे संवर्धन करण्यासाठी हा दिवसच नाही तर दररोज काम केले पाहिजे.   

 

No comments

Powered by Blogger.